बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी उंब्रज परिसरातील एकाला तीन वर्षे सक्तमजुरी व दंड

Fri 2nd Aug 2024 07:55 pm
बेकायदेशीररीत्या दारू विक्रीच्या उद्देशाने कब्जात बाळगल्या प्रकरणी आरोपीस तीन वर्षाची सक्त मजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ,महाराष्ट्र दारूबंदी कायदयाअंतर्गत शिक्षेचा कराड न्यायालयाचा पहिलाच निकाल

उंब्रज/प्रतिनिधी 

बेकायदेशीररित्या दारू विक्री करण्याकरता दारू कब्जात बाळगल्या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ई अन्वये दोषी पकडून कराड येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम व्ही भागवत यांनी आरोपीस आरोपीस तीन वर्ष सक्त  कारावास व पंचवीस हजार रुपये दंड दंड न भरलेस तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली  .कैलास हणमंत अर्जुगडे  वय ५८ वर्ष रा.हनुमानवाडी ता. कराड जि. सातारा असे शिक्षा ठोठावण्यात  आलेल्या इसमाचे नाव आहे.
कराड न्यायालयाच्या आजवरच्या इतिहासात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत प्रथमच शिक्षा ठोकणत आली असल्याचे समजते.
याबाबत माहिती अशी की, ४ जुलै २०१७ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मौजे शिवडे ता. कराड जि. सातारा गावचे हद्दीत यातील शिक्षा झालेला आरोपी कैलास हनमंत अर्जुगडे याचे मालकीचे खोलीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने छापा टाकला होता त्यावेळी आरोपीचे स्वतःचे कब्जात बेकायदा बिगर परवाना देशी-विदेशी दारूच्या १८० मिली च्या एकूण ३९५४ रुपयेच्या सिलबंद काचेच्या सीलबंद काचेच्या बाटल्या व त्यामध्ये ६२० लिटर दारू असा एकूण २ लाख ८ हजार ५६४ रुपयांचा बेकायदा बिगर परवाना स्वतःचे फायदा करिता विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगले स्थितीत मिळून आला होता म्हणून स्थानिक गुन्ह्या शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष गेनबा जाधव यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात  फिर्याद दिलेने सरकारतर्फे  गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आलेला होता. तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखा साताराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तपासी अधिकारी  जे एच माने यांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण  करून रासायनिक अहवालासह दोषारोपपत्र कराड येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सदरचा खटला कराड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एम. व्ही. भागवत यांचे न्यायालयात सुरू होता. यावेळी सरकार पक्षातर्फे  सरकारी  वकील सौ.रूपालीराजे मोरे यांनी चार साक्षीदार तपासले होते. सरकारी पक्षाच्या साक्षीदारांनी दिलेली साक्ष व सरकारी वकील रूपालीराजे मोरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम व्ही भागवत यांनी आरोपीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई अन्वये दोषी पकडून आरोपी कैलास हणमंत अजुगडे यास तीन वर्ष सक्त  कारावास व पंचवीस हजार रुपये दंड दंड न भरलेस तीन महिने साधा कारावास सुनावली.

उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग अमोल ठाकूर उंब्रज पोलीस ठाण्याचे   सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कार्वेकर व प्रमोद पाटील यांनी पैरवी अंमलदार  म्हणून काम पाहिले.