मुंबई, दि.१५(अनंत नलावडे)-
जेव्हापासून शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास विश्वासू म्हणून मानल्या गेलेल्या आ. प्रताप सरनाईक यांचा मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून परिवहन विभागाची जबाबदारी ज्या मोठ्या विश्वासाने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोपवली ती त्याच सरनाईक यांनी थेट भाजप नेते नितीन गडकरी यांना डोळ्यासमोर ठेवून अगदी कोण काय बोलेल याची तमा न बाळगता धडाक्यात व अल्पावधीत एस टी. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मग कधी तिला तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न कर, तर कर कधी एस टी च्या वाहक व चालक कर्मचाऱ्यांना आवश्यक सोईसुविधा मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून राज्यातल्या विविध डेपोंची केलेली पाहणी व दिलेले सक्त निर्देश असोत, प्रवाशांची काळजी घेत त्यांना विविध डेपोत आवश्यक असणाऱ्या सोईसुविधा प्राधान्याने मिळाव्यात याकरिता खुद्द केलेला पाठपुरावा असो. अशा एकसारखे एक धडाकेबाज निर्णय घेत त्यांनी गुरुवारी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची मंत्रालयात आपल्या दालनात एक विशेष बैठक घेत काही मोठे पण प्रवाशांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचे निर्णय जागच्या जागी घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवला.
मग काय त्यांच्या अशा निर्णय क्षमतेमुळे अखेर सरनाईक यांचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरनाईक यांना एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाचीही धुरा सोपवली.मग काय त्यांनी अगदी झपाटल्यागत एकामागोमाग एक एस टी मध्ये आमूलाग्र सुधारणा करण्या चे निर्णय घेण्यास धडाक्यात सुरुवातही केली. असाच काहीसा प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाचा गणल्या जाणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी आज मंत्रालयात महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या एका तातडीच्या बैठकीत घेतला. आणि तो होता आता आमची हक्काची लालपरी ही केवळ बस न राहता, "स्मार्ट बस" म्हणून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.प्रवाशांना सुरक्षित,आरामदायी आणि वक्तशीर प्रवास देण्यासाठीच सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण घोषणा एक खास पत्रकार परिषद घेऊन केली. मुंबईत नव्या ३ हजार अत्याधुनिक बसेस खरेदी प्रक्रियेसंदर्भात बोलताना सरनाईक यांनी स्पष्ट केले की या स्मार्ट बसेसमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग, एलईडी टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ अनालायझर यंत्रणा, आणि चोरी प्रतिबंधक आधुनिक लॉकिंग सिस्टम यांचा समावेश असणार आहे. कारण अगदी काही महिन्यांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, जे प्रवासादरम्यान "तिसऱ्या डोळ्या"सारखे चालकाच्या वाहन चालवण्यावर देखील लक्ष ठेवतील, असा ठाम विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
यासह, कोणतीही बस पार्किंगमध्ये उभी असताना ती पूर्णतः लॉक राहील, अशी व्यवस्था असणार आहे, ज्यामुळे बसमधील सुरक्षा आणखी बळकट होईल, असा ठाम दावाही यांनी केला. नवीन बसेसमध्ये लावण्यात येणाऱ्या एलईडी टीव्हीवर प्रवासादरम्यान प्रवाशांना जाहिरातींसह पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे संदेश, महत्वाच्या घडामोडी दाखवल्या जातील.या टीव्हीमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यानही जगभरातील घडामोडींचे अपडेट मिळेल.यासह, बसेसच्या बाहेरील बाजूसही एलईडी पॅनल्स लावले जातील, जे महामंडळाच्या जाहिरात महसूलात भर घालतील.सध्या तापमान वाढीमुळे एसटी बसेसला आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्या बसेसमध्ये फोम बेस अग्निशमन यंत्रणा बसवली जाणार असून,आग लागण्याच्या ठिकाणी फोमद्वारे आग तात्काळ विझवण्याची यंत्रणा तयार करण्यात आत्याचेही सरनाईक यांनी आवर्जून नमूद केले. या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे एसटीच्या बसेस अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि प्रवाशांना अधिक चांगला अनुभव देणाऱ्या ठरणार आहेत.
या नव्या बसेसच्या आगमनामुळे एसटी अपघातांची संख्या कमी करणे आणि फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवणे शक्य होणार आहे. "भविष्यात एसटी खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल!" असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
आता खरा प्रश्न उरतो तो कोणत्याही परिवहन मंत्री म्हणून त्या पदावर आलेल्या कोणत्याही आलेल्या नेत्याचा म्हणा वा आमदार,मंत्री. कारण आज एस टी ची गत अशी आहे की भीक नको पण कुत्रा आवर. म्हणजेच सोप्या भाषेत आई भीक मागू देईना आणि बाप जेवू देईना अशी झाली आहे. आता परिवहन मंत्री म्हणून त्यांना जर खरच एस टी महामंडळाला आर्थिक तोट्यातून नफ्यात आणायचे आणायचे असेल व चालक वाहक यांचे जीवनमान उंचवायचे असेल तर त्यांनी आता खऱ्या अर्थाने आपल्या नेत्यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे खास बैठक घेऊन एस टी ला लागणारा टोल व इंधन अधिभार या जाचातून तिला मुक्त करावे. मग या महामंडळाला राज्य सरकारकडे कधीच याचना करावी लागणार नाही व ते तोट्यातून फायद्यात येइल अशी ठाम शक्यता या क्षेत्रातले तज्ञ बोलून दाखवत आहेत.
.........................(