शिक्षक मतदारांनाही आवरला नाही सेल्फीचा मोह

Mon 21st Oct 2024 06:41 pm
कराड दक्षिण स्वीप अंतर्गत यशवंत हायस्कूल येथे मतदान जागृती कार्यक्रम अपूर्व उत्साहात संपन्न.. मी मतदान करणारच सेल्फी पॉइंट वर सेल्फी काढण्यासाठी लगबग..

मसूर / प्रतिनीधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जागृती अभियान स्वीप अंतर्गत राबविण्यात येत आहे. कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून यशवंत हायस्कूल कराड येथे मतदान जागृती संदर्भातील सेल्फी पॉइंट उभारण्यात आला असून या सेल्फी पॉइंटवर शिक्षक मतदारांनाही सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रविंद्र पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे शंकरराव थोरात, विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे, सहाय्यक नोडल अधिकारी सुनील परीट, आनंदराव जानुगडे, ऋषिकेश पोटे, संतोष डांगे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जागृती प्रतिज्ञा घेतली. तसेच विद्यार्थ्यांनीही सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून मतदान जागृतीचा संदेश पोहोचवला.विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना आपण मतदान करायला लावणारच अशी शपथ ही यावेळी घेतली. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच स्वीप पथकाचे नोडल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.